⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आदिवासी पाड्यांवर रामनवमी साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । एरंडोल शहरातील वनवासी आश्रम कल्याण शाखा व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने माजी नगरसेवक एन.डी.पाटील व नगरसेविका जयश्री पाटील यांनी रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर शहराच्या परिसरातील आदिवासी पाड्यांवर रामनवमी निमित्त ‘ राम खिचडी ‘ चा महाप्रसाद वाटप केला.

या प्रसंगी शहराबाहेरील उत्तम पाडा या ठिकाणी सुमारे १५ ते २० वर्षांपासून चोपडा येथुन निर्वासित आदिवासी सुमारे ७० ते ८० घरे असलेल्या ठिकाणी, पद्मालय येथील आदिवासी पाड्यावर,निगुळकर यांच्या शेतसमोरील वस्ती,धरणगाव रस्त्यावरील पावरा, बोरला बंधु भगिनी, उमरदे येथील सर्व नागरिक यांना एकत्र करून जवळपास ७०० ते ८०० नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी व भगिनींनी आदिवासी नृत्य सादर केले.

याप्रसंगी भाजपा जनजाती प्रदेशाचे प्रमुख अँड.किशोर काळकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश ठाकुर,पत्रकार आल्हाद जोशी,शैलेश चौधरी,कुंदन ठाकुर,गुर्जर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील,संध्या महाजन,राजपुत ताई,आरती ठाकुर, शोभा साळी,विवेक ठाकुर,गणेश सोनार, भरत महाजन,भुषण चौधरी,मंगीलाला पावरा,मुरलीधर बारेला,प्रकाश बारेला,सुभाष बारेला, इश्म कोठवाडी,सागर महाजन,हितेश सोनार,निलेश मानुधने,अशोक चौधरी,अमोल जाधव,हितेश चौधरी,शुभम मोराणकर,दिपक पाटील,राकेश पाटील,गणेश पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी असंख्य आदिवासी बांधवांनी परिश्रम घेतले.