जळगाव जिल्हाहवामान

आजही खानदेशमधील जिल्ह्यात वि‍जेच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । राज्यातील अनेक भागाला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने झोडपून काढले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने मुसळधार हजेरी लावली. ही जण नदी-नाल्याच्या पूरात वाहून गेले. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र जळगावसह अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तर काही ठिकाणी पाऊस सुरूच आहे. अशातच हवामान खात्याने आज विदर्भासहीत खानदेशमधील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागाला पाऊस झोडपून काढण्याची भीती आहे.

या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट
धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात वि‍जेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या भागात प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. नदी-नाल्यांना पूर असताना ओलंडण्याचे धाडस न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button