जळगावात “सौरभ स्मृती चषक २०२६” टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

एप्रिल 18, 2026 5:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । द्वारकाई खडके मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित “सौरभ स्मृती चषक २०२६” ही अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा दि. ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत विविध भागांतील संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

Saurabh Memorial Cup

स्पर्धेचा अंतिम सामना छत्रपती वॉरियर जळगाव व महाराणा केकेआर, छत्रपती संभाजीनगर यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना छत्रपती वॉरियर जळगाव संघाने ६ षटकांत ३ बाद ३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात महाराणा केकेआर संघाने ५.४ षटकांत २ बाद ३५ धावा करत विजय मिळवून चषक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या महाराणा केकेआर संघाला रोख रक्कम रुपये २ लाख व चषक, तर उपविजेत्या छत्रपती वॉरियर जळगाव संघाला रुपये १ लाख व चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांकासाठी नानाभाऊ सोनवणे युवा मंच, जळगाव संघाला रुपये ५१ हजार व चषक देण्यात आला.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून सागर चौधरी यांना रुपये ११ हजार, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयदीप यांना रुपये ११ हजार, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून क्रांतिकुमार राठोड यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अक्षय जाधव यांना इलेक्ट्रिक स्कूटर व चषक देऊन गौरविण्यात आले.

समारोप प्रसंगी विनोदभाऊ सोनवणे, निलेश तायडे (नगरसेवक), किशोर चौधरी (प्रशिक्षक), शशांक उत्तरदे (रणजी खेळाडू, मुंबई संघ), नानासाहेब सोनवणे, सुनील (बंटी) भारदे, सागरभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच हर्षल खडके, दीक्षा खडके, हर्षिता खडके, गुंजन खडके, सौरभ पाटील, चंदन उत्तरदे, विजय महाजन आदींची उपस्थिती लाभली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी द्वारकाई स्पोर्ट्स फाउंडेशन, आयोजक मंडळ, खेळाडू व ग्राउंड्समन यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now