जळगाव लाईव्ह न्यूज । १६१ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह. येथील सरपंच शारदा भागवत पाटील यांनी अवैद्य वाळू उपसा बंद होण्याबाबत अनेकदा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग व एरंडोल तहसीलदार यांना वेळोवेळी पत्राद्वारे लेखी भ्रमणध्वनी द्वारे व तोंडी स्वरूपात सूचना देऊन ही अवैद्य वाळू उपसा बंद होत नसल्याने दि. १७ सोमवार रोजी येथील तहसील कार्यालया समोर पती, मुलगा व मुलगी यांच्या समवेत आत्मदहनाच्या इशारा दिला आहे.
याबाबत सरपंच शारदा भागवत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत जाणिव दिली असून तरीसुद्धा अवैद्य वाळूचा उपसा बंद झालेला नाही. मी स्त्री सरपंच असल्याने मला वाळू तस्कर जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने मी माझ्या पतीला सोबत घेऊन वाळू तस्करांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्या पतीवर दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी प्राणघातक हल्ला केल्याने त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने आमच्या जीवाला बाळू तस्करांकडून धोका असल्याने त्यांच्या हातून मारण्यापेक्षा स्वतः आत्मदहन करावे असा निर्णय सरपंच व त्यांच्या कुटुंबीयासह सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या विषयी शारदा पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील , आमदार चिमणराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, एरंडोल उपविभागीय अधिकारी, एरंडोल तहसीलदार, एरंडोल पोलीस निरीक्षक यांना पत्र दिलेले आहे.