⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

सरपंचपदाची निवडणूक लढविली अन् जिंकलीही.. पण माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव आले समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । एका महिलेने सरपंचपदासाठी निवडणूक लढली आणि जिंकलीही पण माहिती अधिकारामधून धक्कादायक वास्तव आले समोर आले. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पतीच्या नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेऊन मतदार यादीत नाव नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सरपंचपदाची निवडणूक लढविली आणि जिंकली. महिला सरपंचाचा हा गैरप्रकार माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीतून उघडकीस आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीची २०२२ मध्ये निवडणूक झाली. यात सरपंचपदासाठी उमेदवार असलेल्या कविता संतोष राठोड यांचे ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदारयादीत नाव नसताना त्यांनी दुसरी महिला कविताबाई संतोष राठोड या यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. याच नावावर उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक जिंकली. दरम्यान, या संदर्भात रमेश राठोड यांनी तहसील कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात या निवडणुकीतील कागदपत्रांची माहिती मागितली. त्यात कविता संतोष राठोड यांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे लक्षात आले.

१३ सप्टेंबर २०२३ ला राठोड यांनी तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दिला. तहसील कार्यालयाने सर्व चौकशी करून खुलासा सादर करण्यासाठी ७ फेब्रुवारीला कार्यालयात बोलावले होते. तक्रारदार रमेश राठोड यांनी घडलेला गैरप्रकार योग्य त्या कागदपत्रांसह तहसीलदारांच्या लक्षात आणून दिला. यावेळी दोन्ही पक्षकारांचे वकील उपस्थित होते. तहसीलदारांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी ५ मार्चला ठेवली आहे.