⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सारबेटे बु. येथे आमदार पाटील यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम अमळनेर मतदारसंघातील प्रत्येक टंचाईग्रस्त गाव जलयुक्त करण्याचा ध्यास आमदार पाटील यांनी घेतला असताना गेल्या 30 ते 35 वर्षांपासून टंचाईचे चटके खाणाऱ्या सारबेटे बु.गावासाठीही 92.60 लक्ष किमितीची पाणीपूरवठा योजना मंजूर झाली असून नुकतेच त्याचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जलजीवन मिशन अंतर्गत 92.60 लक्षची योजना मंजूर झाली असून, या योजनेमुळे मागील 30- 35 वर्षापासून गावात असलेली पाणीटंचाई दूर होणार आहे. पाटील हे नेहमी या मार्गावरून जळगाव जातांना पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल त्यांनी डोळ्यांनी पाहिले होते. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत आमदारांना या गावात मताधिक्य नसताना केवळ महिला भगिनींचे होणारे हाल आणि कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता आमदारांनी ही मोठी योजना दिल्याने ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. योजना मंजुरीची माहिती ग्रामस्थांना कळताच या आनंदाचा प्रचंड जल्लोष साजरा केला. भूमिपूजन प्रसंगी सुरवातीला आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यकर्त्यांचा शब्द पाडणार

आमदारांनी गावातील आपल्या कार्यकर्त्यांच्या गावप्रती असलेल्या तळमळीचे खूप कौतुक केले. तसेच निवडणूकीत आपण पाणीपुरवठा योजना देण्याचे आश्वासन कोणतेही राजकारण न करता अथवा मताधिक्य न मिळाल्याने निगेटिव्ह भावना न ठेवता पूर्ण केले असून भविष्यात देखील आपण या गावाला काहीही कमी पडू देणार नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांचा शब्द प्रमाण असून ते सांगतील ते ते नक्की देणार अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

यावेळी सरपंच रज्जब खान इस्माइल खान, ग्रा.पं.सदस्य हारूनखान मुमताज़ खान मेवाती, नइम खान कयुम खान उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हारून मुमताज़ मेवाती, इमरान खान वाहेद खान, ज्ञानेश्वर कोळी, नफीसा बी.अमजद, रज़िया बी. शकील, आबेदा बी. वाहब, बानू बी मेहमूद शाह, महेमूद मजीद, शकील अमीर, साबिर वाहेद, शकील महेबूब, इसरायल कसम, युसूफ नथे, अमजद उमर, साबिर इस्माइल, मजीद बशीर, हाशिर हामिद, बशीर नज़ीर, सद्दाम इस्माइल, कासम मंसूर, नबी सेठ, निसार सेठ, नबी सरदार, हसन सत्तार, वाहब गुलाब, इस्माइल सेठ, महेमूद शाह, विश्वास भिला पाटील, देवराम शेनपेडू पाटील, यशवंत हिम्मत पाटील, आसिफ युसूफ, इरफ़ान वाहेद, अली रज्जाक, सत्तार रहीम, उस्मान रहीम, शादाब हनीफ, फारूक सरदार, सद्दाम सलीम, अकरम मुमताज़, ममहू मिस्त्री, रऊफ सेठ, जमील जमाल, असलम इस्माइल, नाजिम मजीद, शाकिर गुलताज़, इब्राहिम हनीफ, आदम मंसूर, ज़ाहिर उमर, वकील अमीर, रहीम नत्थे, गनी गफूर, फरीद महेमूद, शारुख खलील, युसूफ रहेमन, रऊफ महमद, रईस महमद, वकील महमद, मस्तान रसूल, महमद मुनीर, आबिद मकबूल, फरान रऊफ, आसिफ इब्राहिम, राजीक रफिक, अस्लम मुमताज, फारूक गफ्फुर उपस्थित होते.