जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात सध्या चोरटे सैराट झाले असून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यातून चोरट्यांना खाकीचा धाकच उरलेला नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगाव तालुक्यातील जळके येथे अज्ञात चोरट्यांनी सराफा दुकान फोडून दहा हजारांच्या रोकडसह तिजोरी व चांदी मिळून दोन लाख 35 हजारांचा ऐवज लांबवला.सराफा दुकान मालक मनोज प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात चोर ीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नेरी गावातील रहिवासी मनोज प्रकाश पाटील यांचे जळके येथे कृष्णा ज्वेलर्स नामक सराफा दुकान आहे. या दुकानाचे चॅनल गेट आणि शटर सोमवारी सकाळी उघडे दिसून आल्यानंतर सरपंच विनोद पाटील यांनी दुकान मालक मनोज पाटील यांनी माहिती कळवली.
पाटील यांनी दुकानात जावून पाहिले असता दुकानातील लोखंडी तिजोरी, तिजोरीतील दोन हजार 400 ग्रॅम वजनाची चांदी, ड्रावरमधील दहा हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले.