डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

फेब्रुवारी 25, 2026 2:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) अंतर्गत दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

gp gadgebaba jayanti

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोहन सुर्यवंशी तसेच उपप्राचार्य व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. पी. आर. देवरे आणि प्रा. आर. डी. चौधरी यांनी आपल्या भाषणातून संत गाडगे महाराजांच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.

Advertisements

आपल्या मनोगतात त्यांनी संत गाडगे महाराजांनी समाजप्रबोधन, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवा या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशवी बंदी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयांवर घोषवाक्ये देत जनजागृती केली. तसेच स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारित सामूहिक नाटिका सादर करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisements

याच दिवशी रा.से.यो. स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून संत गाडगे महाराजांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा वाघ हिने केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. अधिकारी व विस्तार शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्रीती दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेबाबत जागरूकता आणि समाजसेवेची प्रेरणा निर्माण झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now