⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | महाराष्ट्र | संजय राऊतांना दिलासा नाहीच ; तुरुंगातील मुक्काम वाढला..

संजय राऊतांना दिलासा नाहीच ; तुरुंगातील मुक्काम वाढला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना आज ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र न्यायालयाने राऊतांना झटका दिला आहे.

यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान, संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे. राऊत यांच्या अटकेनंतरही ईडीने (ED) मुंबईतील अनेक ठिकाणी धाडसत्र केलं. गोरेगाव येथेही राऊत यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने राऊत यांना कोर्टाकडून (court) दिलासा मिळू शकला नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

आज कोर्टात हजर करण्यापूर्वी राऊत यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना लगेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात राहावं लागणार आहे. 5 सप्टेंबर रोजीच त्यांच्या पुढील सुनावणीवर निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज राऊत यांनी कोर्टात कोणतीही तक्रार केली नसल्याचं सांगण्यात आलं. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.