मंत्री गुलाबरावांच्या मतदारसंघात खा.संजय राऊतांची तोफ धडाडणार!

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना नेते खा. संजय राऊत हे लवकरच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अजून कोणीही अधिकृत घोषणा झालेली नाही. (sanjay raut in jalgaon)

अधिक माहिती अशी की, ईडीच्या कारागृहातून नुकतीच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची सुटका झाली आहे. त्यांना जमीन मंजूर झाला आहे. पर्यायी संजय राऊत लवकरच संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ते जळगाव जिल्ह्यातून करणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बीकेसी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी टीका केली होती. याचबरोबर विविध सभांमध्ये व प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना फुटण्याचे खापर फोडले होते. यामुळे या सर्व आरोपांना उत्तर संजय राऊत हे स्वतः देणार असून धरणगाव येथे सभा घेऊन ते गुलाबराव पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला करणार आहेत. असे म्हटले जात आहे.

नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या तालुका निहाय बैठकीमध्ये संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील याबाबतची घोषणा केली होती. त्यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणावे होते की, खा. संजय राऊत जेल मधून बाहेर आल्यावर धरणगाव येथे सभा घेतील. यामुळे आता संजय राऊत लवकरच धरणगाव मध्ये सभा घेतील. असे म्हटले जात आहे.

याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, संजय राऊत लवकरच जळगाव जिल्ह्या दौरा करतील. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेले नाही. मात्र लवकरच खा.संजय राऊत यांचा जळगाव जिल्हा दौरा होणार आहे