गुलाबराव पाटील म्हणजे ‘गुलाबो गॅंग’ : संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२३ । सध्या जळगावातील राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजेच मागील काही दिवसापासून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. यातच माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित उद्या पाचोरा येथे सभा होणार असून या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे जळगाव दौऱ्यावर आहेत.

यादरम्यान, संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर टीकेचे बाण सोडले आहे. गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘अनेक जण लायकी नसतानाही मुख्यमंत्री होतात’, असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना हॉटेल मध्ये घुसू असा इशारा दिला आहे. त्यावर संजय राऊत यांनी त्यांचे आव्हान स्वीकारत गुलाबराव पाटील सांगत आहे त्याच हॉटेलमध्ये राहून दाखवतो, घुसून दाखवा म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या राजकीय भविष्यावर संजय राऊत यांनी भाष्य करत ते परत निवडून येणार नाही म्हणत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाचोऱ्याच्या सभेपूर्वी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात आव्हान प्रतीआव्हान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पाचोरा येथील सभेत आमच्यावर बोलाल तर सभेत घुसेल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी घुसून दाखवा असे म्हंटल्यावर गुलाबराव पाटील बॅकफुटवर गेले होते.