जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं आहे. दरम्यान बंडखोर आमदारांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे.
मतदार संघात निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे वेगळेच आहेत. गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) तर जुलाबराव असे म्हणत त्यांना मिळालेले ५० खोके कधीच पचणार नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हे सर्व पेशासाठी केल्याचा आरोपही त्यांनी आमदारांवर केला आहे.
बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणे दिली आहेत. पण खरं कारण त्यांच्याकडून लपवलं जात आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. आता हे बंडखोर आमदार संजय राऊताला आणि शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरत असले तरी यामागची कारणे वेगळी आहेत. ती आणखीन यांनी समोर आणलेलीच नाही असे सांगत हे सर्व पैशासाठी केल्याचा आरोपीही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे. आता तरी त्यांनी खरं कारण सांगावे असे खुले आव्हानच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून केले आहे.