महाराष्ट्रराजकारण

Mumbai Crime : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळनंतर महिलेने दिली पोलिसात तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । संजय राऊत यांनी बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार स्वप्ना पाटकणर यांनी केली होती. पाटणकर यांना आलेल्या धमकिच्या पत्रात किरीट सोमय्या यांचे देखील नाव होते. यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या मागणी नुसार वाकोला पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०९,५०६,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचा ईडीकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. हा जबाब राऊत यांचा विरोधातील असल्याने धमक्या येत असल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. जबाब मागे घेण्यात यावा तसेच तुम्हाला किरीट सोमिया यांनी असे बोलण्यास सांगितले असल्याचा जबाब ईडीला द्या अन्यथा तुमच्यावर बलात्कार करून तुम्हाला जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली असल्याची माहिती पाटकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे. या घोटाळा प्रकरणात जबाब मागे घेण्यासाठी राऊत दबाव आणत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पाटणकर यांच्या धमकीची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश विवेक फणसळकर यांनी वाकोला पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाटकर यांनी त्यांना दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

र रात्री संजय राऊतां विरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी राऊतांवर ही सर्व कारवाई झाली आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्वप्ना पाटणकर यांच्या तक्रारीनंतर संजय राऊतां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Back to top button