जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीत बंडखोरी; जेडीसीसी अध्यक्षपदी संजय पवार तर उपाध्यक्षपदी अमोल पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदासाठी राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचेच संचालक संजय पवार यांनी बंडखोरी करत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, मतदान होवून संजय पवार विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले होते. यात संजय पवार यांचाही अर्ज होता. अखेर महाविकास आघाडीत बंडखोरी होवून संजय पवार यांना ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली.

महाविकास आघाडीत बंडखोरी

पक्षाने माझी उमेदवारी निश्‍चित केली होती. त्यानुसार मी अर्ज केला केला होता. मात्र संजय पवार यांनी बंडखोरी केल्याने पक्षाचा पराभव झाला. पक्षश्रेष्टी त्यांच्यावर कारवाई करेल, अशी प्रतिक्रीया रविंद्र पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० मते पक्षासोबत राहिली. एकाने बंडखोरी केली. त्यांना काँग्रेस व शिवसेनेने विश्‍वासघात केल्याने जेडीसीसीत महाविकास आघाडीचा घात झाला, अशी प्रतिक्रीया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Related Articles

Back to top button