सांगवीच्या तरुणीला दुचाकीवरून येत पळविले

ऑक्टोबर 18, 2022 12:43 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच तरुणाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 1 1 jpg webp

तालुकयातील सांगवी बुद्रुक येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सायंकाळी आपल्या घराच्या ओट्यावर होती. त्या ठिकाणी गावातीलच रोनक राजू तडवी हा दुचाकी घेऊन आला व अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवत फुस लावून तिला पळवून पसार झाला.

हा प्रकार निदर्शनास येताच पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर राजू तडवी याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now