रेशन दुकानावरील सेल्समनची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मार्च 29, 2022 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील रेशन दुकानावर सेल्समन म्हणून काम करणार्‍या एका 56 वर्षीय इसमाने आमोदा शेत शिवारातील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आलीय. अशोक वामन भंगाळे (रा.लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ मूळ रा.आमोदा ता.यावल) असे मृताचे नाव आहे.

ashok bhangale succied jpg webp

अशोक भंगाळे हे रेशनदुकानावर सेल्समन म्हणून कामाला होते. सोमवारी ते दुचाकी घेऊन आमोदा येथे जाण्याकरीता घरून निघाले होते. सायंकाळ झाली मात्र ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोबाईलवर कॉल करण्यात आला मात्र कॉल एका वेगळ्याच इसमाने उचलला व त्यानंतर भंगाळे यांच्या आत्महत्येचा उलगडा झाला.

फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, अरुण नमायते, महेश वंजारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतावर आमोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फैजपूर पोलिसात भरत भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत भंगाळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now