जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२४ । ह .भ. प . संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वारकरी मेळावा, सद्गुरु श्री कुवरस्वामी वाघोड ता. रावेर येथे आज 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी संतानी मार्गदर्शन करताना समाजात योग्य दिशा आणि संस्कार संतच देत असतात. जेव्हा जेव्हा समाज भरकट असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात. धर्म आणि संस्कार टिकवण्याचे जबाबदारी सर्वांची आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या जोडीने राष्ट्र मजबूत होऊ शकते. संत नेहमीच समाजासाठी कार्य करत असतात. असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुनील नेवे,प्रमुख मान्यवर म्हणून ह.भ. प.सुभाष महाराज पातोंडी,ह. भ.प.दुर्गादास महाराज, ह.भ.प. कन्हैया महाराज,ह.भ. प.यादव महाराज विटवा, ह .भ. प. दीपक महाराज,ह.भ. प. नितीन महाराज खिर्डी, ह.भ. प.रामदास महाराज वाघोड, ह. भ. प. विनायक महाराज लोणी,, ह.भ. प.रामदास महाराज वाघोड , ह.भ. प. पद्माकर महाराज, ह.भ. प. गणेश महाराज विटवा, प्रा. वी.ना. चौधरी , भाजपा जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे,भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा पूर्व, जळगाव जिल्हा पश्चिम आणि महानगर समन्वयिका डॉ .केतकी ताई पाटील ,भाजपा प्रदेश सदस्य सुरेशजी धनके, फैजपूर चे माजी नगराध्यक्ष पांडुरंगदादा सराफ, राजन लासुरकर, प्रल्हाद पाटील, कृष्णा पाटील, डॉ. जागृती फेगडे आदी मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी हिरालाल भाऊ चौधरी,वासुदेव नरवाडे,विलास चौधरी,सुनील बारी,सुनील नेहते,पी.आर. चौधरी , अनंत पाटील, दिलीप महाजन, सुभाष महाजन ,सुधाकर महाजन, ह .भ. प . धनु महाराज आदी उपस्थित होते. ह.भ. प. संतोष महाराज यांनी वाढदिवसा निमित्त या वारकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जळगाव जिल्हा ,बुलढाणा आणि परिसरातील वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.