⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव शहरात साईबाबांचा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  सालाबादाप्रमाणे यंदाची साईबाबाबांचा पुण्यतिथी महोत्सव (वर्ष६८वे) बळीराम पेठ साईबाबा मंदीरात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२६ सप्टें.२०२२ (सोमवार) रोजी सकाळी ९.३० वाजता पुजारंभ, धुनी प्रज्वलन व महोत्सवाचे उदघाटन स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरणजी सरस्वती, महर्षी कण्व आश्रम, कानळदा यांचे शुभ हस्ते होणार आहे. दि. २६ सप्टें. २०२२ ते ०७ ऑक्टो. २०२२ पर्यंत होणा-या या महोत्सवात स्थानिक भगिनी मंडळांचे भजन दररोज दुपारी ०४ वाजता मंदीरात होणार आहेत.

तसेच विजयादशमी दि.०५ ऑक्टो. २०२२ (बुधवार) रोजी मंदीरासमोर दुपारी १२ ते २ या वेळेत नैवेदय-अन्नदान, दि.०६ ऑक्टो. २०२२ रोजी सोयगाव येथील रवी महाराज व त्यांचे सहका-यांच्या भजने-भारुडांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरुन साई पादुकांची पालखी मिरवणुक सायंकाळी ४.०० ते ९.०० या वेळेत टाळ-मृदंगाचे सवादय साथीने निघेल व दि. ०७/१०/२०२२ रोजी द्वादश् गोपाळकाला व तीर्थप्रसादाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काशिनाथआप्पा बारशे, सचिव सतीश खलाणे व विश्वस्त मंडळाने केले आहे.