बकाले यांना बडतर्फ करा, अन्यथा..

सप्टेंबर 15, 2022 6:40 PM

erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले चांगलेच चर्चेत आले आहे. त्याच्याविरोधात राज्यासह जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून विविध ठिकाणी निषेध केला जात आहेत. एरंडोल येथे देखील मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह, घाणेरडे, घृणास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यास सेवेतून बडतर्फ करून खात्यांतर्गत चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन येथील पोलिसांना देण्यात आले.

jalgaon 2 1

सदर निवेदन मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा, राजे संभाजी पाटील मंडळ व सकल मराठा समाज यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जळगांव एलसीबी पोलिस विभागात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरण बकाले या बेजबाबदार अधिकार्‍याने मराठा समाजाबद्दल अगदी खालची भाषा वापरून आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण विधान केले आहे. सरकारी सेवेत असणारा एखाद्या पोलिस अधिकार्‍याने एखाद्या समाजाबद्दल अत्यंत चुकीचे, खालच्या पातळीचे द्वेषपूर्ण विधान करणे हे निषेधार्हच नसून तर त्या अधिकार्‍याला भररस्त्यात चोप देण्यासारखा गुन्हा आहे. अशा व्यक्तींमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते म्हणून अशा समाजकंटकांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे अशा जातीय द्वेष पसरविणार्‍या पोलिस अधिकार्‍याला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून खात्यामार्फत सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल करावा, कुठलाही हलगर्जीपणा प्रशासनाने करू नये असे निवेदनात म्हटले आहे. यापुढे मराठा समाजाबद्दल अशा घटना घडल्यास समाज रस्त्यावर उतरून अशा समाजकंटकांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Advertisements

निवेदनावर रामराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, प्रा. मनोज पाटील,राकेश पाटील सर, संदीप वाघ, रविंद्र पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र शिंदे सर, शालिग्रामभाऊ गायकवाड, देविदास पाटील, किशोर पाटील, संभाजी पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, हेमंत पाटील, शरद पाटील, बाळासाहेब पाटील, पंकज पाटील, शरद पाटील, स्वप्निल सावंत, अ‍ॅड. दिनकर पाटील, प्रभाकर पाटील, किशोर पाटील, सुभाष पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now