---Advertisement---
बोदवड

बोदवड शहरात मूल पळवणारी महिला पकडल्याची अफवा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । बोदवड शहरात लहान मुलं पळवणाऱ्या महिलेला अटक केल्याची अफवा शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू अशा कोणत्याही अफवेवर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.

jalgaon 76

शहरात मुलं पळवणारी महिला फिरत असल्याबाबत पोलिसांना फोन आल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे गावात गेले. यावेळी त्यांनी त्यांनी एका महिलेस पोलीस स्टेशनला आणले. परंतु सदर महिला ही वेडसर असल्याबाबतची माहिती समोर आली. यानंतर मात्र, शहरात मात्र मुलं पळवणारी महिला पकडली गेल्याची अफवा पसरली. याबाबत नागरिकात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आवाहन केले की, शहर व परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची मुलं पळवणारी टोळी कार्यरत नसल्याने जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुणावर संशय आल्यास तात्काळ बोदवड पोलिसांची संपर्क करावा, असे आवाहन पो.नि. गुंजाळ यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---