जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । नूतन मराठा महाविद्यालयीन परिसरात दुपारी ५ वाजेच्या सुमारास महाविद्यालया बाहेरील व्यक्तींनी महाविद्यालय परिसरामध्ये मद्यपान करून आल्याने, व येऊन विद्यार्थीनींसोबत अश्लील भाषेचा वापर करीत असभ्यवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच त्या व्यक्तीने विद्यार्थीनींना धमकवण्यात आले. यामुळे विद्यार्थीनींमध्ये भीती चे वातावरण पसरले असता अभाविप जळगांव च्या वतीने विद्यार्थीनींच्या सुरक्षेला घेऊन निवेदन देण्यात आले.
सदरील व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी प्राचार्य यांनी सकारात्मक चर्चा करून विद्यार्थिनीच्या सुरक्षेची या विषयात योग्य ती कार्यवाही करून कडक पावलं उचलण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थींनी हर्षदा पाटील, चारू शर्मा, सानिका कानडे, प्राची नाईक, संकेत पगारे, त्याचप्रमाणे अभाविप नगरमंत्री मयूर माळी, मनीष चव्हाण, भुमिका कानडे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.