⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | नोकरी संधी | परीक्षा देण्याची गरज नाही! 10वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत निघाली 4096 पदांवर भरती

परीक्षा देण्याची गरज नाही! 10वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत निघाली 4096 पदांवर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजन (RRC) ने 4 हजारांहून अधिक शिकाऊ (अप्रेंटिस) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाहीय. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या भरतीची अधिकृत अधिसूचना rrcnr.org वर प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. म्हणजेच उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याचा अवधी असेल.

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार :
निवड पद्धत :
मॅट्रिक/एसएससी/10वी (किमान 50% एकूण गुणांसह) आणि आयटीआय परीक्षेत उमेदवाराने मिळवलेल्या टक्केवारीतील गुणांची सरासरी घेऊन तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर अधिनियम शिकाऊ ( अप्रेंटिसउमेदवारांची निवड केली जाईल.
दोन उमेदवारांना समान गुण असल्यास, वयापेक्षा जास्त असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारीख सुद्धा सारखीच असेल, तर आधी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा प्रथम विचार केला जाईल.
नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.