⁠ 
रविवार, मे 5, 2024

वडगाव लांबे शिवारात विहिरीत आढळला मादी बिबट्याचा कुजलेला मृतदेह‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । वडगाव ( ता.चाळीसगाव ) येथील लांबे‎ शिवारात साेमवारी सकाळी मादी‎ बिबट्याचा कुजलेला मृतदेह‎ विहिरीत आढळला. दोन‎ महिन्यापूर्वी याच परिसरात उसाच्या‎ शेतात मादी बिबट्या आणि दोन‎ बछडे आढळून आले हाेते. त्याच‎ शिवारात मृत बिबट्या आढळून‎ आला आहे.‎ विहीरीजवळ दुर्गंधी आल्यानंतर‎ शेतकऱ्यांनी विहीरीत डोकावून‎ पाहिले असता ही घटना उघडकीस‎ आली. या घटनेची माहिती‎ मिळाल्यानंतर वन विभागाच्या‎ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव‎ घेतली. बिबट्याचा मृतदेह‎ विहिरीतून बाहेर काढून जागेवरच‎ ‎ शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार‎ करण्यात आले.

वडगाव लांबे येथे‎ भिकन दगा पाटील यांच्या शेतात ही‎ घटना उघड झाली. वन्यजीव रक्षक‎ राजेश ठोंबरे यांना माहिती‎ कळवल्यानंतर त्यांनी वनविभागाला‎ माहिती दिली. उपवनसंरक्षक विवेक‎ होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक‎ सुदर्शन शिसव यांच्या‎ मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र‎ अधिकारी शितल नगराळे, जी. एस.‎ पिंजारी, एस. बी. चव्हाण, आर.‎ आर. पाटील, एस. एच. जाधव,‎ वाय. के. देशमुख, श्रीराम राजपूत‎ यांच्यासह वनमजुरांनी मृत‎ बिबट्याला जेसीबीद्वारे विहिरीतून‎ बाहेर काढले. घटनास्थळी‎ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा‎ रावणकर यांनी शवविच्छेदन केले.‎

हे देखील वाचा :