जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । पिंप्राळा हुडको येथे ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरात कुजलेल्या स्थितीत सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आढळून आला. याबाबत मंगळवारी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नरेश अशोक साळुंखे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. साळुंखे पिंप्राळा हुडको येथील भिमनगर भागात एकटेच राहत होते. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद घरातून उग्र वास शेजारच्यांना येत होता.

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याची माहिती रामानंदनगर पोलीसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता घरात नरेश साळुंखे याचा खाटावर कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






