मारहाण झालेल्या रोशनी शिंदे गर्भवती नाहीत : ठाकरे गटाचा दावा ठरला खोटा
जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : ठाकरे गटाच्या एका गर्भवती महिला कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या महिलांनी हल्ला केल्याची बातमी समोर आल्या नंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या वतीने याचा निषेध करण्यात आला होता. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिची भेटही घेतली होती.
मात्र ही महिला गर्भवती नव्हतीच तसंच तिला कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्याचं आढळून आले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे तर तिच्यावर उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. आळेगावकर म्हणाले कि, काल रात्री १०.३० च्या सुमारास रोशनी शिंदे सिव्हील रुग्णालयातून माझ्या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. त्यांना गंभीर मारहाण झालेली नाही. त्यांच्या पाठीवर मुक्या माराच्या हलक्या खुणा आढळल्या आहेत. सोनोग्राफी केली, मात्र कोणतीही अंतर्गत जखम, रक्तस्राव आढळून आला नाही.तिला कोणतेही फ्रॅक्चर नाही, किंवा जखमही झालेली नाही. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.”
डॉक्टर पुढे म्हणाले, “आम्ही रात्री या महिलेच युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली, त्यानंतर पुन्हा १२ तासांनी युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तीही निगेटिव्ह आली. त्यामुळे सध्या तरी ती गर्भवती आहे, असं म्हणता येणार नाही.