जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राेहयाेअंतर्गत होणार केळीची लागवड, ‘इतके’ रुपये मजुरी दिली जाणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । मनगेरा अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) आतापर्यंत आंबा, लिंबू, मोसंबी या फळपिकांची लागवड केली जात होती. आता यामध्ये यंदाच्या वर्षापासून केळीचाही (Banana) समावेश असणार आहे. या याेजनेत शेतकरी शेतात, शेताच्या बांधावर फळबाग लागवड करू शकणार असून या याेजनेमुळे जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) केळीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

केळीचा उत्पादन खर्च अधिक असताना नैसर्गिक आपत्तीमुळे हाेणारे नुकसान अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी केळीचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत हाेते. अलीकडेच शासनाने केळीला फळाचा दर्जा दिला असून केळीचा समावेश फळबाग याेजनेत केला आहे. फळबाग याेजनेसाठी राेजगार हमी याेजनेचे मंजुरीचे दर वाढवून आता २५६ रूपये करण्यात आले आहेत. या याेजनेत शेतकरी शेतात, शेताच्या बांधावर फळबाग लागवड करू शकणार आहेत. फळबागाच्या प्रकारानुसार हेक्टरी खर्च आणि दर निश्चित करणारे आदेश १० ऑगस्ट राेजी शासनाकडून काढण्यात आले आहेत.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा तर होणारच आहे पण उत्पादन घेताना शेतकऱ्यांचा उत्साह काही वेगळाच असणार आहे. केळीचे उत्पादन घेताना जो खर्च होत होता त्यावर अंकूश येणार आहे. फळपिकांसाठी या योजनेतून अनुदान दिले जाते. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button