⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डी.आर.कन्या शाळा प्रथम

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर येथील डी.आर.कन्या शाळेने दोन्ही गटातून प्रथम क्रमांक पटकावले.

मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे ऑडिटर एम.ए.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, नगावचे मुख्याध्यापक तुषार बोरसे होते. ५ वी ते ७ वी गटासाठी “संस्काराचे महत्व” या विषयात डी.आर कन्याशाळेची भाविका सुरेश वाल्हे (प्रथम), के.पी.सोनार विद्यालय जैतपिरचा मोहित पाटील(द्वितीय), मंगरूळ शाळेची नेहा दीपक पाटील (तृतीय) आली आहे. तर ८ वी ते १० वी गटासाठी ‛माझे आवडते समाजसुधारक’ या विषयात डी.आर कन्याशाळेची आकांक्षा राजेश पाटील(प्रथम), सु.आ.पाटील पिंपळे माध्यमिक विद्यालयाची दीपाली अधिकार पाटील (द्वितीय) तर जैतपिर माध्यमिक विद्यालयाची तनुश्री हिरामण पाटील (तृतीय) यांनी बक्षिसे मिळवली असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यावेळी राजेंद्र पाटील, डी.जी.पवार, डी.बी.पाटील, एम.एस.महालपुरे, पी.आर.पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, प्रवीण पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, सुदर्शन पवार उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रभूदास पाटील, अशोक सुर्यवंशी यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

हे देखील वाचा :