⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | मोठी बातमी ! एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी; विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली

मोठी बातमी ! एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी; विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आला. आता यातच एक मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागलीय. त्यापार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजप प्रवेशाचा मर्हूत लागलेला नाहीये.

आता हाती आलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण रक्षा खडसे हे निवडून येतील तेव्हाच त्यांचा प्रवेश केला जाईल, असंही म्हटलं जात होतं.

आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने आता एकनाथ खडसेंना प्रवेश दिला जाणार आहे. पक्षात प्रवेश झाल्यानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. कारण एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. या वृत्तावर बोलतांना बावनकुळेंनी सुचक विधान केलंय. अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झाला नाहीये. ज्यावेळी ते भाजपमध्ये येतील त्यावेळी पाहू असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणालेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.