⁠ 
बुधवार, मे 8, 2024

सुनसगाव स्फोट : दोन्ही मयत कामगारांवर अंत्यसंस्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । भुसावळपासून १४ किमी अंतरावरील बेलव्हाय शिवारातील दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनीत फर्निश ऑइलने भरलेल्या टाकीला वेल्डिंग करताना स्फोट झाला. शुक्रवारच्या या दुर्घटनेत दाेन कामगारांचा जागीच मृत्यू झाला हाेता. शवविच्छेदन झाल्यावर दोघांवर अंत्यसंस्कार झाले.

भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय शिवारातील दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनीत शुक्रवारी (दि.२१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑइलच्या टाकीला वेल्डिंग करताना स्फोट झाला होता. या दुर्घटनेत काशीनाथ फत्तू सुरवाडे (रा.खेडी रोड, जळगाव, मूळ रा.हतनूर) आणि खेमसिंग हेमराज पटेल (रा.बेमतेरा, छत्तीसगड) यांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेतील दोन्ही मृतांवर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मृत पटेल यांचे नातेवाइक छत्तीसगड येथून जळगावात आले. यानंतर त्यांनी जळगाव येथेच अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. तर सुरवाडे यांच्यावर मूळ गावी हतनूर येथे दुपारी बाराला अंत्यसंस्कार झाले. या घटनेप्रकरणी शुक्रवारी रात्री भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

स्फोटात ठार झालेल्या दोघांवर अंत्यसंस्कारतर शनिवारी पोलिसांनी कंपनी मालक कमलाकर माळी यांच्याकडे परवाना व अन्य कागदपत्रांबाबत चौकशी सुरू केली. तपास एपीआय प्रकाश वानखेडे करत आहे. मृत काशीनाथ सुरवाडे हे वांजोळा ग्रामसेवक आनंदा सुरवाडे यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

हे देखील वाचा :