जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती डॉ प्रांजल खेवलकरसह सात जणांना अटक करण्यात आल्यानंतर राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आरोप प्रत्यारोप रंगताना दिसले. दरम्यान या पतीला झालेल्या अटकेनंतर रोहिणी खडसे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

आता शेवटी आज रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. रोहिणी खडसे यांनी लिहिले की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे… प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!

या पोस्टसोबतच रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर याच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघे कोणत्यातरी मंदिराबाहेर दिसत आहेत. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये बरेच काही सांगितले असून वेळ हेच योग्य उत्तर असल्याचे म्हटले असून योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीचे आयोजन प्रांजल खेवलकर यांनीची केल्याचे सांगितले जातंय. दोन रूम या प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने बूक केलेल्या व्हायरल झालेल्या पावत्यांवरून स्पष्टपणे दिसत आहे. रोहिणी खडसेंचे पती व्यावसायिक असून त्यांचे कामानिमित्त कायमच पुण्याला येणे जाणे सुरू असायचे. घटस्फोटानंतर रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकरसोबत लग्न केले.









