जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे दोन्ही एकमेकांवर टीका करताना दिसतंय. यातच चित्रा वाघ यांनी हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम… अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ यांच्या कवितेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उत्तर येण्याआधी रोहिणी खडसे यांनी कवितेच्या स्वरुपातच प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्टवर केली. कशासाठी आमदार व्हायचं असतं काय करू लागली..जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली..ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली..इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली… या भाषेत असं खोचकपणे पलटवार करत रोहिणी खडसेंनी टोला लगावला आहे.
चित्रा वाघ व रोहिणी खडसे दोघांच्याही कवितांवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान उबाठा पक्षाकडून चित्रा वाघ यांच्या कवितेवर नेमकं काय प्रत्युत्तर येतं ये पाहावे लागणार आहे.









