Robbery : रुग्णवाहिकेतून आले दरोडेखोर, सिग्नलला कापड बांधत लुटली रेल्वे

एप्रिल 22, 2022 11:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद-पोटूळ दरम्यान रेल्वे सिग्नलला लाल कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

devgiri

नेमकी काय आहे घटना?
औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर मध्यरात्री ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. रेल्वेच्या S 5 ते S 9 या डब्यांबर दगडफेक करुन दरोडा टाकण्यात आला आहे. रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नला कापड बांधून रेल्वे थांबवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ होती.

ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी ॲम्बुलन्स उभी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांना मिळत आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मात्र अजून सविस्तर माहिती देण्यात आली नाही. दरोडा पडल्यानंतर काही चोरीला गेले आहे का किंवा रेल्वेतील प्रवाशी अजून कोणी जखमी आहे का याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now