⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गॅस एजन्सीत दरोडा; साडे चार लाख लांबवीले

जळगाव लाईव्ह न्युज | २६ एप्रिल २०२२ । चाळीसगाव शहरात एका गॅस एजन्सीत चाकूचा धाक दाखवित चोरट्याने रोकडसह एकूण ४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शांतीनगर येथील अशोक किसनचंद छाबडीया (वय- ५८) हे मालेगाव रोडवरील एच.पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया करीत असतात. दरम्यान दि २५ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छाबडीया हे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन ते मोजत होते. तेवढ्यात दुकानाचा शटर वर करून भावेश मनोज माखोजा (वय २०-२२) रा. उल्हासनगर हा चाकू घेऊन आत आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी देत ३,६५,००० हजार रोकड व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स २९१२) असे एकूण ४,४०,००० रूपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. या प्रकरणी छाबडीया यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल टकले हे करीत आहे.