⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे। मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते धामणगांव (कुऱ्हा-काकोडा) व मुक्ताईनगर ते जुने घोडसगांव या दोन रस्त्यांचे काम सुरु झाले. असून हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊन डोलारखेडा नजिक तीन-चार किलोमीटरवर काम झाले, मात्र खरे परंतु बिएम ५०-५२ एम-एम पर्यत हवा असतांना फक्त ३०,३५,२५ तर कुठे फक्त १५ एम-एम पर्यत असल्याचा प्रत्यक्ष मोजमाप केले असता आढळुन आला. याबाबत डोलारखेडा येथील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी वाद घालुन इस्टेमेंटप्रमाणे काम करण्यात यावे, अन्यथा काम बंद करावे अशी मागणी संबंधित कामगारांना केली. प्रत्यक्ष कामाठिकाणी सा.बा.विभागाचा अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित असणे अनिवार्य असताना या ठिकाणी कुणीही हजर नव्हते, दुपारी ग्रामस्थांनी घातलेल्या वादामुळे नारायण नामक कर्मचारी दाखल झाले. तसेच घटनेची माहीती कळताच बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश ढगे यांनी घटनास्थळी येत स्वहस्ते बिएम’च्या गेझचे मोजमाप केले असता ५० पेक्षा कमी आढळुन आल्याने, त्यांनी काम इस्टेमेंटप्रमाणे न झाल्यास ‘रास्ता रोको आंदोलन’चा इशारा दिला आहे. या प्रसंगी बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल ढगे, डोलारखेडा येथील शिवाजी वानखेडे, कडु कोळी, विनोद थाटे, विजेंद्र कोळी उपस्थित होते.

तसेच मुक्ताईनगर ते जुने घोडसगांव या रस्त्याचेही काम निकृष्ट दर्जाचे होत असून सा.बा.विभागाचे अधिकारी, कर्मचारी करतात तरी काय ..? असा प्रश्न येथील जनमाणसांत व्यक्त होत आहे.