जळगावात कर्कश सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर; १०० सायलेन्सर, २५० फॅन्सी नंबर प्लेट्स चक्काचूर!

एप्रिल 24, 2026 10:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कर्कश आवाजाद्वारे दहशत माजवणाऱ्या बुलेटस्वारांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेले १०० सायलेन्सर्स आणि २५० फॅन्सी नंबर प्लेट्सवर थेट रोड रोलर फिरवून ते निकामी करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत ही धडक कारवाई करण्यात आली.

rd

नेमकी कारवाई काय?
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे आवाज काढण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सार्वजनिक आरोग्याचा विचार करून पोलिसांनी हे सायलेन्सर जप्त केले होते. तसेच, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २५० फॅन्सी नंबर प्लेट्स देखील या मोहिमेत ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या सर्व साहित्याचा रोड रोलरच्या साहाय्याने चक्काचूर करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, ही सर्व जप्त केलेली साधनसामग्री रस्त्यावर ठेवून त्यावर रोड रोलर चालवण्यात आला. या कारवाईतून पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना स्पष्ट संदेश दिला आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यास अशीच कठोर कारवाई सुरू राहील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now