जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । रावेर येथील पोलीस ठाण्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उटखेडा रोड, संभाजी नगर, बंडू , इमामडा, चावडी भाग, कोतवाल वाडा, नागझिरी रोड, रसलपूर , महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारागीर नगर, बारी वाडा, भोई वाडा, गांधी चौक, डॉ . हेडगेवार चौक मार्गे पथसंचलन करण्यात आले.

यावेळी शिघ्र कृती दलाचे जवान, आर सीपी जवान , रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान या पथसंचलनात सहभागी झाले होते. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, रॅपीड अँक्शन फोर्स चे डेप्यूटी कमांडर शशिकांत रॉय, असि . कमांडर संतोष यादव, इन्स्पेक्टर जी एस झारिया, सब इन स्पेक्टर अजय कुमार सिंग, रामचंद्र पाटील, पोलीस फौजदार मनोहर जाधव,, सचिन नवले, विशाल सोनवणे उपस्थित होते.













