काळजी घ्या ! जळगाव ठरतोय उष्णतेचे ‘हाॅटस्पाॅट’

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । मागील काही दिवसापासून जळगावच्या तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अकोला, जळगाव आणि मालेगाव जिल्हे उष्णतेचे ‘हाॅटस्पाॅट’ ठरले.

मंगळवारी अकाेल्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये ४२.८ तर जळगावात ४२.६ अंश सेल्सिअस एेवढ्या विक्रमी तापमानाची  नोंद करण्यात आली. जळगावात तीन दिवसांत पारा सतत ४२ अंशापुढे राहिला आहे.

यंदाचा उन्हाळा तीव्र असून, दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हांमुळे जळगावकर चांगलेच त्रासले आहे. जबरदस्त उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ज एप्रिल महिन्याचा शेवटच्या आठवड्यात तापमानाची उसळी चांगलीच जाणवत आहे. पुण्यातील भारत माैसम विभागाने वर्तवलेला अवकाळी पावसाच्या अंदाजानुसार राज्यात १ मे पर्यंत वातावरण ढगाळ असेल. या काळात तापमान देखील विक्रमी पातळीवर राहिल. यावर्षी उन्हाळ्यातील सरासरी तापमान एक अंशाने अधिक राहिल, असा अंदाज जागतीक अभ्यासकांनी अगाेदरच वर्तवला हाेता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमान सलग ४२ अंशापुढे आहे. त्यामुळे जळगावकर चांगलेच घामाघूम झाले आहेत.

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शहरातील नेहमी गजबजणारे रस्ते ओस पडले आहेत. सध्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु असल्याने नागरिक बाहेत पडत आहे. त्यातही सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत आहे. शहरातील तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.