दंगल : निरपराध, सारखे नाव असलेल्या तरुणाची सुटका करा, ईदगाह ट्रस्टची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । शनी पेठ पोलीस स्टेशन येथे दाखल दंगलीच्या गुन्ह्यामध्ये निरपराध, सारखे नाव असलेल्या तरुणांचा समावेश असून त्यांची त्वरित सीआरपीसी १६९ प्रमाणे सुटका करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट’तर्फे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांना साकडे घालून करण्यात आली.
जळगाव मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांच्या नेतृत्वात सचिव अनीस शाह, संचालक मजहर खान, वाहिदत ए इस्लामीचे अध्यक्ष अतिक अहमद, एम.आर.असोसिएशनचे तनवीर पटेल, तसेच पालकांतर्फे सय्यद हनीफ व फारुक अहेलेकार यांनी पोलीस अधीक्षकांना साकडे घालून वस्तुस्थिती विशद केली.
निरपराध, सारखे नाव असलेले संशयित आरोपी
पोलीस खबरी तील आरोपी सैयद मोहसिन ऊर्फ काल्या हा आरोपी असला तरी साम्य नाव असलेल्या सय्यद मोहसिन सय्यद हनीफ या तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे. वास्तविक पाहता सय्यद मोहसिन हा मुस्लिम इदगाह कब्रस्तान या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे तर मोहसिन सैयद ऊर्फ काल्या हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा तपास करीत आहे म्हणून सय्यद मोहसीन याची त्वरित सुटका करण्यात यावी, पोलीस खबरीतील संशयित आरोपी इकराम ताहेर शेख हा तरुण मागील चार वर्षापासून नामांकित औषध निर्मिती कंपनी सीपला मध्ये एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहे रविवारी ते आपल्या घरी आईला भेटायला आला असता पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. पोलीस खबरीतिल आरोपी दानिश शेख सत्तार काकर हा तरुण दिव्यांग असून त्याला ऐकू येत नाही तो बिल्डिंग पेंटिंग चे काम करतो सकाळी आठ ला घरून जातो तर रात्री आठ ला परत येतो अशा या दिव्यांग तरुणाला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस खबरीतिल संशयित आरोपी खालीद शेख गुलाम रसूल वय ४४ हा तरुण फुले मार्केटमध्ये कुटुंब उदरनिर्वाहासाठी सव्य रोजगार अंतर्गत कार्य करतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो दगडफेकीच्या नंतर तो आपल्या घरासमोर उभे असलेल्या बंदोबस्तातील पोलिसांना पाणी पाजन्याचे कार्य करीत होता व काही वेळानंतर पाण्याची मशीन बंद करण्यासाठी घराबाहेर आला असता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.