⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही! पदवीधरांना थेट सरकारी नोकरीची संधी..

कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही! पदवीधरांना थेट सरकारी नोकरीची संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही केंद्र शासनाच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी नक्कीच आहे. रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. RFCL Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. 2 मार्च 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. या भरती प्रक्रियेतून 27 पदे ही भरली जाणार आहेत. कोणतीही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये

पदाचे नाव व आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1) अभियंता (Engineer)- 19
शैक्षणीक पात्रता :
B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
2) वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) – 02
शैक्षणीक पात्रता :
एम.एस्सी. (रसायनशास्त्र), अनुभव 01 वर्षाचा
3) लेखाधिकारी (Accounts Officer) – 05
शैक्षणीक पात्रता :
CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
4) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )- 1
शैक्षणीक पात्रता :
MBBS

वयश्रेणी : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 ते 35 असणे आवश्यक आहे. वयाची अट ही उमेदवारांना पाळावी लागणार आहे.
अर्ज फी :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या UR, OBC, आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी रु. 700/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
असा करा ऑनलाइन अर्ज
सर्वप्रथम https://jobapply.in/rfcl2024professionalE1/ या लिंकवर क्लीक करा
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी जमा करा.
अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती तुमच्याकडे ठेवा.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.