प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे धावणाऱ्या रिवा-मुंबई विशेष गाडीच्या कालावधीत वाढ

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दर आठवड्याला धावणाऱ्या विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

train jpg webp

गाडी क्रमांक ०२१८७ रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ३ जुलैपर्यंत धावणार होती. आता ती २५ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – रिवा साप्ताहिक विशेष गाडी, अधिसूचित दि. ४ जुलैपर्यंत होती. आता २६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीची वेळ वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.

या स्थानकावर आहे थांबा?
सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, गदरवाडा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, दादर या स्थानकावर थांबा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now