जळगाव जिल्हामुक्ताईनगरराजकारण

भाजपा मुक्ताईनगरची आगामी निवडणुकी संदर्भात आढावा बैठक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची “विस्तृत आढावा बैठक” २१ रोजी खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या उपस्थितीत खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर येथे संपन्न झाली.

बैठकीत खासदार रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य नंदू महाजन यांच्यामार्फत उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन, बुथ रचना, पक्षाचे नियोजित कार्यक्रम व आगामी येणाऱ्या निवडणूक सारख्या विवीध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येऊन, येणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढवणार असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी तयार राहून, पक्षाचे नियोजित कार्यक्रम आपआपल्या निवडणूक क्षेत्रात राबवावे असे यावेळी आव्हान करण्यात आले.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस विनोद पाटील, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, विनायक पाटील, भाजयुमो विधानसभाक्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष असगर खान, अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष झनके, भाजयुमो तालुका सरचिटणीस मयूर महाजन उपस्थित होते.

Related Articles

Back to top button