जळगांव लाईव्ह न्यूज । दि.१० मार्च २०२२ । मू. जे. महाविद्यालयातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवतीसभे अंतर्गत विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विज्ञान प्रशाळेचे संचालक डॉ. केतन नारखेडे प्रमुख अतिथी मनोज गोविंदवार, युवती सभेच्या प्रमुख प्रा.हेमलता पाटील उपस्थित होत्या.

एक दिवसीय कार्यशाळेत चार सत्र संपन्न झाले. प्रथम व व्दितीय सत्राचे प्रमुख अतिथी मनोज गोविंदवार यांनी ‘अव्दितीय तू, दिव्य शक्ति तू’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या आत दिव्य शक्ति आहे व आपण आत्मपरीक्षण व्दारे आत्मसात करू शकतो. तशी प्रत्याक्षिके विद्यार्थ्यांकडून करुन घेतली. व्दितीय सत्र संवादातून सामर्थ्याकडे ‘संवादातून व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. त्यासाठी संवाद कौशल्याच्या काही टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. संवाद कौशल काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्ष विज्ञान प्रशाळेचे संचालक डॉ. केतन नारखेडे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अशा कार्यशाळेतून घडत असते. त्यामुळे अश्या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा असे मत त्यांनी मांडले. या एक दिवसीय कार्यशाळेत चार सत्र संपन्न झाले. तिसऱ्या सत्रात सेवासंवर्धन प्लेसमेंट, जळगावचे हेमंत भिडे यांनी ‘यशस्वी करियरचे गुपित’करियर कडे वाटचाल करतांना एकाग्रता, निरीक्षण क्षमता, नियोजन, सकारात्मक दृष्टी असली पाहिजे. तशी प्रत्याक्षिके विद्यार्थ्यांकडून करुन घेतली. यशस्वी करियर करिता काही सॉफ्ट स्कील देखील आत्मसात केले पाहिजे असा संदेश दिला.

चौथ्या सत्रात ‘डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगावच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी विद्यार्थ्यांना ‘तिच्या अंतरंगात त्याचे स्थान ’याविषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्री आणि पुरुष यांच्या अंतरंगात मैत्री व सांमजस्य असणे त्यातूनच दोघांन मध्ये निकोप असं नातं निर्माण होत. यातूनच स्त्री-पुरुष समानतेचा भाव जोपासला जाईल असा संदेश दिला. अशा चार सत्रामध्ये विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेच्या उद् घाटननाचे सूत्रसंचालन प्रा. रोशनी पवार, प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा. हेमलता पाटील यांनी केले. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी युवती सभेच्या सदस्या प्रा. संगीता चंद्रात्रे, प्रा.संगीता पाटील, प्रा. योगिनी राजपूत, प्रा.भावना मानेकर, प्रा. देवेश्री सोनवणे यांनी परिश्रम घेतले.







