जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । मागील काही दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आलीय. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. यामुळे सोने प्रति तोळा ७० हजाराखाली गेले होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ दिसून आली. यामुळे सोने पुन्हा ७० हजार रुपयावर गेले आहेत.
जळगावात या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव ७०८०० रुपयावर होता. त्यात गुरुवारी सकाळपर्यंत घसरण होऊन तो ६९८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. मात्र काल गुरुवारी दुपारच्या सत्रानंतर त्यात वाढ दिसून आली. सोने ४०० रुपयांनी वाढून ७०,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
दुसरीकडे चांदी दर स्थिर दिसून आला. सध्या एक किलो चांदीचा दर ८२००० रुपयावर आहे. मागील पाच दिवसात चांदी दरात दोन ते अडीच हजार रुपयापर्यंतची घसरण झालेली दिसून येतेय. तर सीमा शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. उच्चांकीपासून सोन्याचा दर ४ हजार रुपयापर्यंत घसरला आहे. तर चांदीचा दर तब्बल १२ ते १३ हजार रुपयांनी घसरला आहे.