⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात या तारखेपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार

जळगाव जिल्ह्यात या तारखेपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र मागील दोन तीन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने उसंती घेतली असून तापमानात वाढ झाली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आगामी काही दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस होऊ शकतो. परतीच्या पावसादरम्यान दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला आहे. १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल. त्यावेळी दमदार पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात अजून १०० ते १५० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे.

थंडीचे आगमन लवकर व उशिरापर्यंत झोंबणार…
‘ला लिना’ची स्थिती असल्यामुळे यंदा मान्सूनचा मुक्काम वाढणारच आहे. मात्र, त्यासोबतच थंडीचेही आगमन यंदा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर होण्याचा अंदाज आहे. ला लिना’च्या स्थितीमुळे मान्सून जोरदार बरसला आहे. मात्र, उत्तर भारतातून यंदा मान्सून लवकर माघारी फिरणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये लवकर बर्फवृष्टीला सुरुवात होऊ शकते. त्या कारणांमुळे यंदा राज्यात लवकर थंडीचे आगमन होऊ शकते. तसेच फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका राहण्याचा अंदाज आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.