---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात मानवी शरिराचे अवशेष आढळल्याने खळबळ ; फॉरेन्सिक तपासणी केली जाणार

new project (6)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष आढळून आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून हे अवशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

new project (6)

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील धानवड- पिंपळे शिवारातील शेतात जात असलेल्या तरुणाला शेतात मानवी शरिराचे काही अवशेष दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, त्याठिकाणी मानवी शरिरातील कवटी आणि हातापायासह इतर अवशेष दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले.

---Advertisement---

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी प्राथमिक तपास करून मानवी अवशेष जप्त केले आणि ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत मृतदेह किती दिवसांपूर्वीचा आहे, तो पुरुषाचा आहे की स्त्रीचा, मृत्यूचे कारण काय आहे, हे स्पष्ट होण्यासाठी पुढील फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. मृतदेहाच्या अवशेषांच्या आधारे डीएनए चाचणी देखील केली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात मदत होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---