जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. दरम्यान, गेल्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) देखील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात 102.50 रुपये प्रति सिलेंडर कपात केली होती.
कोणत्या शहरात किती दर?
व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत कंपन्यांनी ९१.५ रुपये कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत व्यवसायिक सिलिंडरचा दर १,९०७ रुपये झाला आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर ८९ रुपयांनी कमी झाला आहे. तिथे आता एका सिलिंडरसाठी १,९८७ रुपये मोजावे लागतील. मुंबईत एका सिलिंडरचा दर १,९४८.५ रुपये आहे. आता याच सिलिंडरसाठी १,८५७ रुपये मोजावे लागतील. नवीन दर आजपासून (१ फेब्रुवारी) लागू झाले आहेत.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या दरात कपात होणे अपेक्षित आहे. याआधी कंपन्यांनी १ डिसेंबरला व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग केले होते.
गेल्या ९० दिवसांपासून तेल विपणन कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्याचवेळी क्रूड सात वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर चालत आहे. सोमवारच्या व्यवहारात ब्रेंट क्रूडमध्येही कमालीची वाढ दिसून आली. जागतिक मानक मानले जाणारे ब्रेंट क्रूड 1.30 टक्क्यांनी वाढून 91.20 डॉलर प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.87 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 90.81 वर पोहोचले.
हे देखील वाचा :
- सोने 660 रुपयांनी महागले; खरेदीला जाण्यापूर्वी आजचे भाव पहा..
- सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला..
- रेशनकार्डधारकही सायबर ठगांच्या निशाण्यावर; अशी करताय फसवणूक? अशी काळजी घ्या..
- धारावीचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेत फडणवीस शिंदे सरकारचा अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस!
- खुशखबर! जळगावात सोने ५,७०० ने तर चांदी ११ हजारांनी स्वस्त, आताचे भाव पहा..