जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ५३ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण

ऑगस्ट 28, 2021 2:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवसात ५३ हजार लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतील आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

vaccine

कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ३१ हजार ३६६ लाभार्थ्यांना पहिला तर २१ हजार ७२३ लाभार्थ्यांना दुसरा डोस असा एकूण ५३ हजार ०८९ जणांना लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला.

जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख ६६ हजार ०५९ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा डोस आला आहे. यामध्ये ९ लाख २८ हजार ४२० जणांना पहिला डोस तर ३ लाख ३७ हजार ६३९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्यात १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले.  तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.

तालुकानिहाय झालेले लसीकरण आकडेवारी
जळगाव-३,१४,२९१, भुसावळ-१,६०,९०४ अमळनेर-७८,५७२, चोपडा-८१,०१३, पाचोरा-६७,२४१, भडगाव-४२,३६३, धरणगाव-४२,२६५, यावल-७१,८१३, एरंडोल-३७,४७, जामनेर-८०,६७३, रावेर-८५,८९५, पारोळा-४२,६३९, चाळीसगाव-९८,३०९, मुक्ताईनगर-३९,३५०, बोदवड-२३,०८४ याप्रमाणे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now