⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एका शेतकऱ्याच्या खिशातून ४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित व्यक्तीला अटक केली आहे. अरबाज सलीम शहा (वय २०, रा.अंबिका नगर, ता. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी गावातील शेतकरी पुरुषोत्तम नारायण भवर (वय ३३) हे शनिवारी ४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेले होते. दरम्यान, संशयित आरोपी अरचाज सलीम शहा याने शेतकरी पुरुषोत्तम भवर यांच्या खिशातून चार हजारांची रोकड काढून चोरी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर पुरुषोत्तम भंवर यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

त्यानुसार सायंकाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी अरबाज सलीम शहा याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विश्वास पाटील करीत आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी. सावध राहावे, असे आवाहन चाळीसगाव पोलिसांनी केले आहे