⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

रावेर तालुक्याला अतिवृष्टीची झळ! तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे झाले नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३। रावेर तालुक्यात बुधवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे, शेतांचे आणि घरांचे बहुतेक प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास अधिक कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. जवळपास ६२ हेक्टर क्षेत्रासह ५०० घरांची पडझड झाली आहे. गुरुवारपासून पंचनामा करण्याची सुरुवात झाली आहे. नुकसानीच्या आकड्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२४ गावातील ३८ शेतकऱ्यांच्या ३० हेक्टर कापसाच्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे. नुकसानीचा आकडा ४५ लाखांच्या घरात आहे. ८४ शेतकऱ्यांच्या ३२ हेक्टरवरच्या केळीलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा १ कोटी ४२ लाखांवर आहे. तर १२२ कापूस व केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

जवळपास १ कोटी ८७ लाखांचे नुकसान झाले आहे. जवळपास ५०० घरांचे नुकसान देखील झाले आहे. रावेर तालुक्यातील २८ गावांमधील १५१ घरांची अंशतः पडझड झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे ४४२ घरांमधील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.