रावेर तालुका गुर्जर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील गुर्जर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित होणार असून २०१९-२० व -२१ या वर्षात पुरस्कार प्राप्त समाज बांधव यांनी आपल्या गुणपत्रिकेची/ पुरस्कार प्रमाणपत्राची छायांकित प्रत आपल्या गावातील प्रतिनिधी जवळ २५ मार्च पर्यंत माहिती घ्यावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
गुर्जर समाजाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० तसेच २०२०-२१ मधील दहावीत ८५ टक्के व त्यापेक्षा जास्त, बारावीत ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त, पाचवी नवोदय, पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस, एमटीएस व दहावी एनटीएसच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, पदविका ६५ टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी उत्तीर्ण असे निकष प्राप्त विद्यार्थी तसेच पदवीत्तर तसेच विविध क्षेत्रातील २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात पुरस्कार प्राप्त समाज बांधव यांनी आपल्या गुणपत्रिकेची/ पुरस्कार प्रमाणपत्राची छायांकित प्रत आपल्या गावातील प्रतिनिधी जवळ शुक्रवार दि.२५ मार्च पर्यंत पाठवावी. त्यासोबत छायांकीत प्रतच्या मागे स्वतःचे नाव आईवडीलांचे पूर्ण नाव, गावाचे नाव, व्हाट्सअप मोबाईल क्रमांक हि माहीती द्यावी. कार्यक्रमाची दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल. असे आवाहन रावेर तालुका गुर्जर समाज गुणगौरव समितीने केले आहे.